चोरीला गेलेल्या गाण्याचा वाद मिटवला, यांनी मिटवला वाद |Controversy over the rights of Oh Sheth Song

2021-09-27 1

'ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट’ या गाण्याने अल्पावधीतच रसिकांची मने जिंकली होती. या गाण्यामुळे गायक उमेश गवळी, संगीतकार प्रणिकेत खुळे आणि निर्मात्या संध्या केशे हे त्रिकूट महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले होते.. मात्र गेल्या काही महिन्यांपासून 'कॉपीराईट’च्या मुद्यावरून त्रिकूटामध्ये वादाची ठिणगी पडली अन् हा वाद इतका विकोपाला गेला की थेट हे गाणे यूट्यूबवरून काढून टाकण्यात आले. अखेर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेना आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या एकत्रित प्रयत्नामुळे महामंडळाच्या लवादासमोर हा गाण्याचा वाद मिटला. प्रणिकेत खुणे, संध्या केशे आणि उमेश गवळी यांच्यात गाण्याच्या कॉपीराईटवरून वाद झाला होता. हे गाणे यूट़्यबवरून काढून टाकल्यामुळे या तिघांचेही मोठे आर्थिक नुकसान होत होते. यामुळे संध्या केशे आणि प्रणिकेत खुणे यांनी फेसबूक लाईव्ह करत गाणे चोरीला गेल्याची तक्रार केली होती. Kiran Tajane Vo
#Osheth #Sandhyakeshe #Praniket #UmeshGawali #MNS #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat